१) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी
आयताचे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी.
आयताचे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी.
२) हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूंचा वर्ग.
चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूंचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू खणा-नारळाची,
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ गुणिले पाया गुणिले उंची.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ गुणिले पाया गुणिले उंची.
४) स्वातंत्र्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ,
(सहा बाजू) वर्ग.. हे घनाचे पृष्ठफळ
(सहा बाजू) वर्ग.. हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ
लांबी ७ रुंदी गुणिले उंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.
लांबी ७ रुंदी गुणिले उंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.
६) जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा,
खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा
खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा
७) मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू
चौरसाची परिमिती = ४ बाजू.
चौरसाची परिमिती = ४ बाजू.
८) खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा
विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा
९) दहा किलो म्हणजे एक मण!!
घनाचे घनफळबाजूचा घन!!
घनाचे घनफळबाजूचा घन!!
१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती हवीत सूत्र
गणित सोडवायला माहिती हवीत सूत्र
११) सम आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर तर दुस-यात गुणाकार
पहिल्यात असते गुणोत्तर तर दुस-यात गुणाकार
१२) गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बीटर..!!
एक घनमीटर म्हणजे.. एक हजार लीटर!!!
एक घनमीटर म्हणजे.. एक हजार लीटर!!!
१३) रविवार नंतर सोमवार येतो,
प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग, नेहमीच धन होतो.
प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग, नेहमीच धन होतो.
१४) महादेवाला आवडते बेलाचे पान
कोणत्याही त्रिकोणात एक बाजू,
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान!!
कोणत्याही त्रिकोणात एक बाजू,
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान!!
१५) दोनचा वर्ग चार !! चारचा वर्ग सोळा. !!!
गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!
गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा